वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. 11 जानेवारीला या मालिकेतील पहिला सामना मोहालीत होणार आहे. या स्पर्धेसाठी अफगाण संघाची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये फिरकी गोलंदाज रशिद खानचा समावेश करण्यात आला आहे.
19 सदस्यांच्या अफगाण संघाचे नेतृत्व इब्राहिम झेद्रानकडे सोपविण्यात आले आहे. या संघामध्ये मुजिब उर रेहमानचे पुनरागमन झाले आहे. दरम्यान संयुक्त अरब अमिरात विरुद्ध झालेल्या मालिकेत राखीव खेळाडूत असलेला इक्रम अलीकीलला प्रमुख संघामध्ये या दौऱ्यात बढती देण्यात आली आहे. शारजामध्ये अफगाण संघाने संयुक्त अरब अमिरात विरुद्धची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे.
अफगाण संघ – इब्राहिम झेद्रान (कर्णधार), गुरबाज, इक्रम अलीकील, झेझाई, रेहमत शहा, नजिबूल झेद्रान, मोहम्मद नबी, करिम जेनत, ओमरझाई, एस. अर्शफ, मुजीब उर रेहमान, फरुकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सालेम, गुलबदीन नईब आणि रशिद खान









