वृत्तसंस्था/ मेलबॉर्न
ऑस्ट्रेलियात 9 ते 12 जानेवारी दरम्यान होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ऑस्ट्रेलियन मास्टर्स हौशी गोल्फ चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय गोल्फसंघाचे नेतृत्त्व अवनी प्रशांतकडे सोपविण्यात आले आहे. या स्पर्धेत भारताचे दोन पुरूष आणि दोन महिला गोल्फपटू भाग घेणार आहेत. या स्पर्धेत महिलांच्या विभागात 17 वर्षीय अवनी प्रशांत तसेच हिना केंग तर पुरूषांच्या विभागात संदीप यादव आणि रोहित भारताचे प्रतिनिधीत्व करतील. सध्या जागतिक महिला गोल्फपटूंच्या मानांकन यादीत पहिल्या 50 गोल्फपटूंमध्ये अवनीतचा समावेश आहे.









