रोजंदारी, ठोकमानवरील कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मागणी : महागाई भत्ता फरक, पगार वेळेवर मिळण्यासाठीही अग्रही
कोल्हापूर प्रतिनिधी
महापालिकेतील रोजंदारी, ठोकमानधनावरील सर्व कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भातील प्रस्ताव तत्काळा राज्यशासनाकडे पाठवावा. तसेच रखडलेला महागाई भत्तातील फरकाची रक्कम मिळावा, निवृत्त कर्मचाऱ्यांना त्वरीत पेन्शन लागू करावी यासह 9 प्रमुख मागण्यासाठी 18 जानेवारीपासून संपावर जात असल्याची नोटीस महापालिका कर्मचारी संघाचे जनरल सेक्रेटरी अजित तिवले, रविंद काळे यांनी महापालिका प्रशासनाला दिली आहे.
यामध्ये त्यांनी म्हटले आहे, मनपातील रोजंदारी, ठोकमानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी सांगली, सोलापूर महापालिके प्रमाणेच कोल्हापूर महापालिकेनेही राज्यशासनाला प्रस्ताव पाठवावा. 23 जुलै 2023 मध्ये राज्यशासनाने महागाई भत्ता 38 वरून 42 टक्के वाढ केला आहे. याचबरोबर वित्त विभागने 42 टक्के वरून 46 टक्के इतकी महागाई भत्ता वाढ केली आहे. परंतू याच्या फरकाची रक्कम दिलेली नाही. ही रक्कम त्वरीत मिळावी. कर्मचारी नियुक्त झाल्यानंतर महिन्यांत पेन्शन सुरू करणे बंधनकारक आहे. परंतू असे होत नाही. मुदतीमध्ये पेन्शन दिल गेली नाही तर 18 टक्के व्याजासह रक्कम देण्यात यावी. प्रत्येक महिन्यांच्या 10 तारखेपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन जमा करावी. 2015 ते 2022 दरम्यान, मनपा कर्मचाऱ्यांना गणवेश, साडी दिलेल्या नाहीत. याची फरकाची रक्कम तसेच शिलाई भत्ता मिळावा. ठोकमानधनावरील कर्मचाऱ्यांना किमान वेतननुसार पगार मिळावा. कर्मचाऱ्यांनी अधिकार पत्र देऊन पगारातून संघटनेचे वार्षिक वर्गीणी कपात केली जात नाही. ती कपात करण्यात यावी. ड्रेनेज विभाग, मोरी खात्याचे कामकाज विभागीय कार्यालयाऐवजी पूर्वीप्रमाण मुख्य इमारतीमधून सुरू करावे. रोजंदारीच्या 60 वर्षावरील कर्मचाऱ्यांना कोणत्या कारणात्सव कमी केले याची माहितीची मागणी करूनही प्रशासनाने दिलेली नाही. या सर्व मागण्याबाबत संघटनेशी चर्चा करून निर्णय घ्यावा अन्यथा 18 जानेवारी रात्री 12 पासून संपावर जावू, असा इशाराही कर्मचारी संघाने दिला आहे.
नूतन अध्यक्ष पहिल्या दिवसांपासूनच अॅक्शनमोडवर
महापालिका कर्मचारी संघाची बुधवारी जनरल बॉडी झाली. यामध्ये अध्यक्षपदी दिनकर आवळे यांची निवड झाली. त्यांचा अध्यक्षपदाचा गुरूवारी पहिला दिवस होता. संघटनेची सुत्र हाती घेताच त्यांनी पहिल्या दिवशीच थेट संपाची नोटीस मनपाला दिली. नूतन अध्यक्ष पहिल्या दिवसांपासूनच अॅक्शनमोडर असल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.