वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुरूष आणि महिला मल्लांसाठी राष्ट्रीय कुस्ती सराव शिबिरांचे आयोजन फेब्रुवारी महिन्यात करण्यात आले आहे. पतीयाळा येथे महिलांसाठी तर सोनेपथ येथे पुरूषांसाठी राष्ट्रीय शिबिर घेतले जाणार आहे. अखिल भारतीय ऑलिम्पिक संघटनेतर्फे नियुक्त करण्यात आलेल्या तीन सदस्यांच्या अॅडहॉक समितीच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली.
आशियाई ऑलिम्पिक पात्रता तसेच विश्व पात्र फेरी स्पर्धा येत्या काही दिवसात घेतल्या जाणार असून देशातील पुरूष आणि महिला मल्लांना सरावाची नितांत गरज असल्याने ही शिबिरे घेतली जाणार आहेत. त्याचप्रमाणे जयपूरमध्ये 5 फेब्रुवारीपासून वरिष्ठांची राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा होणार आहे. सोनेपथ आणि पतीयाळा येथे होणाऱ्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय सराव शिबिरानंतर जयपूरमधील स्पर्धेकरीता फ्रीस्टाईल, ग्रीकोरोमन पद्धतीसाठी वरिष्ठ गटातील विविध 30 वजन गटासाठी मल्लांची निवड केली जाईल.









