सरदार्स मैदानानजीक दुभाजकाला बुलेटची धडक : अन्य एक जखमी
बेळगाव : थर्टी फर्स्ट डिसेंबर संपवून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अपघातात एक तरुण ठार झाला. तर आणखी एक तरुण जखमी झाला. सोमवारी पहाटे सरदार्स हायस्कूल मैदानाजवळ ही घटना घडली आहे. पंकज रामचंद्र जगताप (वय 28) रा. भारतनगर, मच्छे असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या अपघातात बुलेटवरील अजय कृष्णा चौगुले (वय 31) रा. मच्छे हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. घटनेची माहिती समजताच खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळूर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास पंकज व अजय हे दोघे बुलेटवरून आपल्या घरी जात होते. चन्नम्मा सर्कलवरून जाताना सरदार्स हायस्कूल मैदानाजवळ बुलेटची दुभाजकाला धडक बसून हे दोघे खाली पडले. डोक्याला जबर दुखापत होऊन पंकजचा मृत्यू झाला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.









