घावनळे/ वार्ताहर
केरवडे येथील श्री देव जगन्नाथ देवस्थान पून:प्रतिपना द्वितीय वर्धापन साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्त विविध धार्मिक ,सास्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.2 जानेवारी सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 यावेळेत श्री देव मोहरांचे आवाहन, सुशोभिकरण, दुपारी वाजता भजनी बुवा दादा जोशी यांचा हरिपाठ व आरती, सायंकाळी कलशासह पालखीची ढोलपथकासह सवाद्य मिरवणूक, 6 वाजता पार्सेकर दशावतार मंडळ ( वेंगुर्ले ) यांचे गणेश हनुमान युद्ध नाटक , १०.३० वाजता श्री. कानडे बुवा यांचे भजन, 3 रोजी सकाळी 8.30 देहशुध्दी, गणहाणे, पुण्यहवचन. श्री गणपती महाभिषेक, जगन्नाथ महाभिषेक परीवार, सर्व देवांना पंचामृत, स्नान, अभिषेक पूजा, अग्रीस्थापना, महामंडल पूजन, ग्रहयज्ञ, प्रधान होम, बलिदान (ओवाळणी), पूर्णाहुती, उपस्थितांना अभिषेक, ब्राह्मण पूजन, महानैवेद्य, आरती, गा-हाणे, सांगता. महाप्रसादः सायंकाळी 6.30 वाजता रामकृष्ण हरी महिला भजन सेवा संघ, (तेंडोली, बुवा ऐश्वर्या चव्हाण) यांचे भजन ,गावातील रक्त दात्यांचा समाज मित्र पुरस्कार वितरण ,नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था : बापू परब.सायंकाळी 7.30 वाजता ,रात्री 8.30 वाजता महिलांसाठी पैठणी कार्यक्रम, 10 वाजता दत्तमाऊली दशावतार मंडळ यांचे मिनाक्षी कन्या नाटक,4 रोजी 4 देवाची तरंग काठी व देवांचा कोल आशिर्वाद आदी कार्यक्रम होणार आहे.उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव जगन्नाथ उत्सव समिती,समस्त मानकरी व ग्रामस्थ ( केरवडे ) यांच्यावतीने करण्यात आले आहे.









