मालवण -:
दोन महिन्यांपूर्वी तळाशीलसमोरील समुद्रात पर्ससीन मासेमारीवरून भर समुद्रात मोठा राडा झाला असतानासुद्धा या भागात साडेबारा वावाच्या आतमध्ये येऊन मिनी पर्ससीन नौका धुमाकूळ घालत असल्याने पारंपरिक मच्छीमार प्रचंड संतापले आहेत. शनिवारी सायंकाळी तोंडवळी समोरील समुद्रात अगदी पाच वावाच्या आतमध्ये येऊन मिनी पर्ससीन नौका मासेमारी करीत होत्या.









