वृत्तसंस्था/ मुंबई
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाचा आज शनिवारी ऑस्ट्रेलियाविऊद्ध दुसरा एकदिवसीय सामना होणार असून घरच्या मैदानावरील पाहुण्यांविऊद्धचा दणदणीत पराभवाचा सिलसिला त्यांना संपवायचा असेल आणि तीन सामन्यांच्या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवायचे असेल, तर त्यांना जबरदस्त कामगिरी करून दाखवावी लागणार आहे.
जेमिमा रॉड्रिग्स (82) आणि पूजा वस्त्रकार (नाबाद 62) यांच्या चमकदार खेळीच्या जोरावर यजमानांनी वानखेडे स्टेडियमवर गुऊवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविऊद्धची त्यांची सर्वांत मोठी म्हणजे 8 बाद 282 अशी धावसंख्या उभारली होती. तरीही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या धावसंख्येचा बचाव करताना भारताने हरमनप्रीतसह (3-0-32-0) सात वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण ऑस्ट्रेलियाने तीन षटके आणि सहा गडी राखून विजय मिळविला.
भारताचा हा दणदणीत पराभव घरच्या मैदानावरील सलग आठवा पराभव असून यजमानांना ज्या पद्धतीने पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये काही प्रमाणात चिंता निर्माण होईल. रेणुका सिंहच्या पहिल्याच षटकात अॅलिसा हिलीचा झेल टिपण्यासाठी स्नेह राणाने डावीकडे सूर मारला होता. पण त्यानंतर भारताचे क्षेत्ररक्षण घसरले आणि क्षेत्ररक्षणातील अनेक त्रुटींमुळे फोबी लिचफिल्ड आणि एलिस पेरी या ऑस्ट्रेलियन जोडीला मोलाची मदत झाली. त्यांनी 148 धावांची भागीदारी केली.
भारताचे नव्या चेंडूवरील गोलंदाज, विशेषत: वस्त्रकार प्रभाव पाडू शकली नाही आणि दीप्ती शर्मा (1/55) व राणा या वरिष्ठ फिरकीपटूंची स्थितीही तशीच राहिली. त्यांनी यापूर्वी एकमेव कसोटीत पाहुण्या फलंदाजांना खूप त्रास दिला होता. सायका इशाकलाही (6-0-48-0) गोलंदाज म्हणून स्थिरावताना अडचणींचा सामना करावा लागला आणि क्षेत्ररक्षणात अनेक चुका झाल्यामुळे संघासमोरच्या अडचणीत भर पडली.
त्यापूर्वी फलंदाजी करताना रॉड्रिग्स आणि वस्त्रकार यांनी आठव्या यष्टीसाटी 68 धावांची भागीदारी करण्यापूर्वी भारतीय फलंदाजांना धडपडावे लागले आणि बहुतेक फलंदाजांना आपल्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रुपांतर करण्यात अपयश आले. पण भारताला हा पराभव मागे टाकणे आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी एका दिवसाच्या कालावधीत त्वरित सावरणे सोपे जाणार नाही. मायदेशातील हंगामातील गेल्या 23 दिवसांतील हा त्यांचा सातवा सामना आहे. प्रकृत अस्वास्थ्यामुळे पहिल्या वनडेला मुकलेली उपकर्णधार आणि महत्त्वाची सलामीवीर स्मृती मानधना दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असेल का हेही पाहावे लागेल. थिंक टँक तसेच भारतीय खेळाडूंसमोरील सर्वांत मोठे आव्हान हे ऑस्ट्रेलियन फलंदाजीला थोपविण्याचे मार्ग शोधण्याचे असेल.
संघ-भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, अमनज्योत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंह ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्रकार, स्नेह राणा, हरलीन देओल.
ऑस्ट्रेलिया-अॅलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राउन, हेदर ग्रॅहम, अॅश्ले गार्डनर, किम गर्थ, जेस जोनासेन, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, बेथ मुनी, एलिस पेरी, मेगन शुट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम.
सामन्याची वेळ : दुपारी 1.30 वा.









