वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनच्या कार्यालयाचे शुक्रवारी स्थलांतर करण्यात आले. यापूर्वी हे कार्यालय भाजपचे खासदार आणि फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरणसिंग यांच्या निवासस्थानी होते. दरम्यान क्रीडा मंत्रालयाकडून अलिकडेच यासंदर्भात आक्षेप घेण्यात आल्याने हे कार्यालय दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले.
भारतीय कुस्ती फेडरेशनचे कार्यालय आता नवी दिल्ली येथील हरिनगर उपनगरामध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनचे मंडळ अध्यक्षासह निलंबीत यापूर्वीच करण्यात आले आहे. हे प्रकरण हाताळण्यासाठी आता अखिल भारतीय ऑलिम्पिक संघटनेने तीन सदस्यांची समिती नियुक्त केली असून या समितीचे प्रमुख भुपेंदरसिंग बावा हे आहेत.









