वेंगुर्ले (वार्ताहर)-
बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे संस्थापक व प्रथम प्राचार्य बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांचा ६० स्मृतिदिन कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगले यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत वकील ॲड. शाम गोडकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर बॅ. बाळासाहेब खर्डेकर स्मृतिदिनाचे चेअरमन प्रा.वामन गावडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक दिलीप शितोळे, कलावलयचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळू खामकर, विद्यार्थी मंडळ सचिव फाल्गुनी नार्वेकर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे ॲड. शाम गोडकर यांनी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर साहेबांच्या कार्य कर्तृत्वाची माहिती विद्यार्थ्यांना सांगून त्यांच्यासारखे अष्टपैलू व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांमध्ये घडणे आवश्यक आहे, तसेच बॅरिस्टर खर्डेकर साहेबांचे इंग्रजी भाषेवरील असणारे प्रभुत्व विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे, बॅ. खर्डेकर अष्टपैलू खेळाडू होते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळाकडे लक्ष दिले पाहिजे याचा फायदा विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी होईल असे प्रतिपादन केले.अध्यक्ष स्थानावरून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगले यांनी बॅ. खर्डेकर साहेबांच्या विविध पैलूंचा उलगडा केला. यामध्ये प्र. के.अत्रे यांनी परमेश्वराची कलाकृती म्हणजे बाळासाहेब असा गौरव केला होता याविषयी माहिती दिली. संपूर्ण ज्ञानेश्वरीचा गाडा अभ्यास करणारे बॅरिस्टर खर्डेकर साहेब यांना अभिप्रेत असणाऱ्या नवव्या अध्यायातील वचन पूर्ण करण्याचे तसेच ज्ञानेश्वरीच्या तत्त्वविचारांकडे लक्ष द्यावे अशी लडिवाळपणाची प्रार्थना विद्यार्थ्यांना केली.
यावेळी इंग्रजी विभागामार्फत घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक विजेती सानिया वराडकर हीचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच या स्पर्धेतील विजेत्या सानिया गावडे, योजना नवार, फाल्गुनी नार्वेकर, सोनाली चेंदवणकर यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुणे ॲड.शाम गोडकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाला वेंगुर्ला नगरीतील बाबली वायंगणकर, नंदन वेंगुर्लेकर, अशोक दाभोलकर, मिताली होडावडेकर, माजी प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर, प्रा.प्रदीप होडावडेकर, सुरेंद्र चव्हाण, आळवे मामा, वामन धुरी, प्रदीप परब, अशोक सावळे, प्रदीप बोवलेकर, महादेव करंगळे, संजय पाटील यांच्याबरोबर महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपदा दीक्षित व प्रास्ताविक प्रा.वामन गवडे, मान्यवर परिचय डॉ.वसंतराव पाटोळे तर आभार पर्यवेक्षक दिलीप शितोळे यांनी मानले.









