बेळगाव रेल्वेस्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी
बेळगाव : सलग सुट्यांमुळे बेळगाव रेल्वेस्थानक पुन्हा एकदा गर्दीने फुलले. सोमवारी नाताळाची सुटी असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवासी बेळगावमध्ये दाखल झाले. यामुळे संपूर्ण रेल्वेस्थानक गर्दीने फुलले होते. बऱ्याच दिवसांनंतर रेल्वेस्थानकामध्ये अशी गर्दी दिसून आली. नाताळ सण विकेंड जोडून आल्याने अनेकांनी बाहेर फिरण्याचा बेत केला. तसेच इंग्रजी माध्यम शाळांना नाताळाची आठवडाभर सुटी असल्याने पर्यटनासाठी बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढली होती. बेळगावमधून बेंगळूर, मुंबई, हैदराबाद, तिरुपती, दिल्ली या ठिकाणी जाण्यासाठी गर्दी होत होती. या मागर्विंर धावणाऱ्या एक्स्प्रेसचे यापूर्वीच बुकिंग फुल्ल झाले होते. इयर एंडिंगला बाहेर फिरण्याचा प्लॅन केलेले नागरिक आता पुन्हा परतू लागले आहेत. विशेषत: तिरुपती-हैदराबाद येथून पुन्हा बेळगावमध्ये येणाऱ्यांची संख्या रविवारी, सोमवारी दिसून आली. त्यामुळे रेल्वेला गर्दी झाली होती. बेळगावहून एर्नाकुलमच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेसही फुल्ल भरून जात आहेत. केरळ तसेच आसपासच्या परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.









