पीसीबी’च्या आतबट्ट्याच्या कारभारावर महालेखापरीक्षकांच्या लेखापरीक्षण अहवा
वृत्तसंस्था/ कराची
सहा संघांसह आर्थिक महसुलाच्या वाटणीचा मॉडेल आणि इतर विसंगतींमुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाला त्याच्या पाकिस्तान सुपर लीगमधून लाखो ऊपयांचा महसुली तोटा सहन करावा लागला असल्याचे पाकिस्तानच्या महालेखापरीक्षकांच्या कार्यालयाच्या लेखापरीक्षण अहवालातून स्पष्ट झाले आहे.
या अहवालाचे जे तपशील पाकिस्तानी मीडियामध्ये समोर आले आहेत ते पाहता ‘पीसीबी’ने ‘आर्थिक ब्रँड’ म्हणून ‘पीएसएल’मध्ये सर्व काही ठीक आहे असा आभास निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ‘एजीं’च्या अहवालात आर्थिक मॉडेल आणि ‘पीएसएल’विषयीच्या विविध बाबींविषयी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आणि या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची शिफारसही करण्यात आली आहे.
महसुलासंदर्भातील बदललेल्या नफा वाटणी व्यवस्थेमुळे तोटा झाला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, महसुलातील संघांचा हिस्सा वाढविल्यामुळे ‘पीसीबी’ला 16,37,977 दशलक्ष ऊपयांचे मोठे नुकसान झाले आहे. यातील रंजक भाग असा की, पीसीबी आणि विविध संघ यांच्यात केलेल्या 10 वर्षांच्या करारानुसार 2025 मध्ये 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्यात कोणत्याही सुधारणा केल्या जाऊ शकतात.
‘एजीं’च्या अहवालात असेही नमूद केले आहे की, लीगच्या पाचव्या आवृत्तीपासून ‘पीसीबी’ला तोटा सहन करावा लागलेला आहे. त्यावेळी मीडिया हक्कांतून मिळणाऱ्या महसुलातील संघांचा वाटा 80 टक्क्यांपर्यंत वाढवला गेला आणि मंडळाकडे फक्त 20 टक्के हिस्सा राहू लागला. त्याचप्रमाणे प्रायोजकत्वाच्या अधिकारांतून मिळणाऱ्या महसुलातील 40 टक्के वाटा संघांकडे आणि 60 टक्के मंडळाकडे अशी विभागणी करण्यात आली आहे, तर तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलातील 90 टक्के वाटा संघांकडे आणि फक्त 10 टक्के वाटा पीसीबीकडे गेलेला आहे. यामुळे ‘पीसीबी’ला 810 दशलक्ष ऊपयांच्या संभाव्य कमाईपासून वंचित राहावे लागल्याचे अहवालात म्हटले आहे. शिवाय ‘पीएसएल’च्या सहाव्या आवृत्तीवेळी हा आर्थिक फटका 827 दशलक्ष ऊपयांपर्यंत वाढल्याचे त्यात नजरेस आणून दिले आहे.
लातून ताशेरे









