वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विदेशी गुंतवणूकदारांनी (एफपीआय)भारतीय शेअर बाजारात या महिन्यात आतापर्यंत 57 हजार 300 कोटी रुपयांची भर घातली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदरची गुंतवणूक ही मोठी मानली जात आहे.
राजकीय स्थिरता आणि दमदार आर्थिक विकास या निकषावर विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यामध्ये रस दाखविला.
यंदा विदेशी गुंतवणूकदारांनी एकूण 1.62 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक शेअरबाजारात केली आहे. नव्या वर्षामध्ये अमेरिकेत व्याजदर कमी होण्याची शक्यता असून विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअरबाजारात गुंतवणूक करण्यामध्ये पुन्हा रस घेऊ शकतात, असेही म्हटले जात आहे. 22 डिसेंबरपर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात 57 हजार 313 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.









