भिलवडी वार्ताहर
येथील शैलजा नरेंद्र चव्हाण यांची एमपीएससी परीक्षेमध्ये मुलीत राज्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे .व सर्वसाधारण गटांमध्ये तिसरी दुय्यम निबंधक पदी निवड झाली आहे .
भिलवडी सारख्या ग्रामीण भागामध्ये बालवाडी ते दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. बारावी सायन्सनंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्यांच्या घरी शैक्षणिक वारसा नसतानाही त्यांनी ऑनलाइन अभ्यास करून हे ध्येय साध्य केले आहे त्यांचे कुटुंब शिरगाव तालुका वाळवा येथील असून भिलवडी येथे दत्तक आलेल्या आहेत. गावापासून दीड किलोमीटर अंतरावरती त्या राहतात घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुख सुविधा नसतानाही जिद्दीने अभ्यास केला. आई वडील हे शेतकरी व शेतमजूर असून त्यांच्यामध्ये मुलगी शिकावी हे एकमेव जिद्द होती . मुलीला शिक्षणामध्ये चांगला सपोर्ट आई-वडिलांनी दिला त्या वेळेला बोलताना चव्हाण म्हणाल्या आईची व वडिलांची प्रेरणा व जिद्द यामुळे मला हे ध्येय गाठणे साध्य झाले आहे .