अशोक नगर येथे असलेले क्रीडासंकुल अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. बॅडमिंटन कोर्ट आणि स्विमिंग पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांच्यात नाराजी पसरली आहे.मंगळवारी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी स्थानिक नगरसेवक आणि इतर अधिकार्यांसह क्रीडा संकुल परिसराची पाहणी केली. आणि सांगितले की हे क्रीडा संकुल पुन्हा लोकांसाठी खुले करण्यास आणि इमारतींच्या उपयुक्ततेसाठी आवश्यक नूतनीकरण करणे गरजेचे आहे.आरोग्य उत्तम राहण्यासाठी खेळ हा महत्वाचा घटक आहे.असे सर्व सोयीसुविधांनीयुक्त असलेले क्रीडासंकुल बंद राहणे योग्य नाही. तसेच नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी साठी आणि शहराच्या विकासासाठी हे क्रीडा संकुल महत्वाचे आहे. भूतकाळात अशा सुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे हे पाहून खरोखरच वाईट वाटते. तसेच परिसरातील नागरी कामांच्या प्रारंभासाठी असद खान सोसायटीला देखील आमदार सेठ यांनी भेट दिली.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









