वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कुवेतचे अमीर शेख नवाफ अल अहमद अल जाबेर सबाह यांचे शनिवारी वयाच्या 86 व्या वषी निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. शेख नवाफ यांच्या दुर्दैवी निधनाची बातमी कळताच खूप दु:ख झाल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आम्ही कुवेतच्या राजघराण्याबद्दल आणि लोकांप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो, असे ट्विट त्यांनी केले. यासोबतच सरकारने रविवारी एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात राष्ट्रध्वज अर्ध्यावर राहणार आहे. शेख नवाफ यांच्या निधनाची माहिती सरकारी टीव्हीवरही देण्यात आली आहे. शेख यांनी सप्टेंबर 2020 मध्ये सत्ता हाती घेतली होती. गेल्या महिन्यात श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले होते.









