पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती
बेळगाव : तालुक्यात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली असून या घटनेतील पीडित महिलेच्या कुटुंबीयांच्या मदतीला राज्य सरकारने धाव घेतली आहे. सरकारतर्फे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून 5 लाखाच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. याबरोबरच पीडित महिलेला कायदा सेवा प्राधिकारकडून 50 हजाराची मदत जाहीर करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.









