टी-10’ स्वरुपात खेळविली जाण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’द्वारे एक द्वितीय स्तरीय क्रिकेट लीग सुरू करण्याची तयारी चालली असून त्याचे स्वरुप बहुदा ‘टी-10’चे राहण्याची शक्यता आहे. त्याचा आराखडा तयार करण्याचे काम चालू आहे. एका वृत्तानुसार, पुढच्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ही लीग होऊ शकते आणि या कल्पनेला संबंधित विविध घटकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
सदर वृत्तानुसार, या लीगच्या बाबतीत ‘टी-10’ की, ‘टी-20’ स्वरुपात पुढे जायचे आणि ‘आयपीएल’च्या हिताला हानी न पोहोचण्याच्या दृष्टीने या लीगसाठी वयोमर्यादा लागू करायची की नाही याबाबत बीसीसीआयला अजून निर्णय घेता आलेला नाही. ‘बीसीसीआय’चे सध्या आगामी आयपीएल लिलावावर लक्ष केंद्रीत झाले आहे, जो 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे.









