वृत्तसंस्था /बेंगळूर
2023 च्या प्रो कब•ाr लीग हंगामातील येथे खेळविण्यात आलेल्या प्राथमिक फेरीतील सामन्यात तामिळ थलैवाजने तेलुगू टायटन्सचा 38-36 अशा केवळ 2 गुणांच्या फरकाने पराभव केला. या सामन्यात तामिळ संघाच्या नरेंद्रची कामगिरी दर्जेदार झाली. त्याने या सामन्यात 10 गुण मिळविले. या सामन्यात तामिळ थलैवाजतर्फे नरेंद्रने 10 गुण तर पवन सेहरावत आणि रॉबिन चौधरी यांनी प्रत्येकी 7 गुण घेतले. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला तेलगू टायटन्सने तामिळ संघावर 3-1 अशी आघाडी मिळविली होती. 11 व्या मिनिटांपर्यंत तेलूग टायटन्सचा संघ 10-8 असा आघाडीवर होता. तामिळ संघातील नरेंद्र आणि अजिंक्य पवार यांनी आपल्या चढायावर गुण वसूल करत तामिळ थलैवाजला 12-12 अशी बरोबर साधून दिली. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत तामिळनाडू संघाने 20-17 अशी बढत मिळविली होती. पवन शेरावत तसेच रॉबिन चौधरी यांच्या आक्रमक डावपेचामुळे 26 व्या मिनिटांअखेर दोन्ही संघ 22-22 असे बरोबरीत होते. 37 व्या मिनिटाला तामिळ संघाने तेलगू टायटन्सवर 32-28 अशी 4 गुणांची आघाडी मिळविली. सामन्यातील शेवटच्या मिनिटाला तामिळ संघाने तेलगू टायटन्सचे सर्वगडी बाद करत हा सामना 2 गुणांच्या फरकाने जिंकला.









