दमदार स्टोरेजसह फोन दाखल: किंमत 52,999 रुपये
नवी दिल्ली : चीनी टेक कंपनी आयक्यू ने भारतात आयक्यू 12 हा 5जी स्मार्टफोन बाजारात सादर केला आहे. कंपनीने हा फोन दोन प्रकारात सादर केला आहे. 12 जीबी रॅम 512 स्टोरेजसोबत येणाऱ्या फोनची किंमत 52,999 रुपये आणि 16 जीबी रॅम सह 265 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ही 57,999 रुपये राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कार्यक्षमतेसाठी फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसर असणार असून हा देशातील पहिला 5जी फोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. प्राप्त अहवालानुसार जानेवारी 2024 मध्ये वनप्लस 12 सह अन्य अनेक स्मार्टफोन या प्रोसेसरसह बाजारात येणार आहेत. ज्याला हा स्मार्टफोन टक्कर देणार आहे.









