वृत्तसंस्था/ दरबान
टी-20 वर्ल्ड कपसाठी आदर्श कॉम्बिनेशन शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात निराशा झाली. पावसामुळे हा सामना एकही चेंडूचा खेळ न होता रद्द करण्यात आला. या सामन्याची नाणेफेकसुद्धा होऊ शकली नाही.
आता भारतासमोर फक्त पाच टी-20 सामने तयारीसाठी राहिले आहेत. दोन द.आफ्रिकेविरुद्ध आणि तीन अफगाणविरुद्ध जानेवारीत मायदेशात होणार आहेत. टी-20 वर्ल्ड कप पुढील वर्षी विंडीज व अमेरिका येथे होणार आहे. त्या दृष्टिकोनातून भारताने येथील मालिकेत दणक्याने सुरुवात करण्याचा इरादा राखला होता. पण त्यांच्या आशेला पावसाने धक्का दिला. वर्ल्ड कपआधी आयपीएल होणार असल्याने 15 सदस्यीय संघ निवडण्यासाठी या लीगवर अवलंबून रहावे लागणार आहे. आता या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी सेंट जॉर्ज पार्क गेबेरा (पोर्ट एलिझाबेथ) येथे होणार आहे. सूर्यकुमार यादव हंगामी कर्णधार म्हणून या मालिकेत हार्दिकच्या जागी काम पाहत आहे. त्याने नुकत्यात मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही त्याने कुशल नेतृत्व करीत पाच सामन्यांची मालिका 4-1 अशा फरकाने जिंकत कर्णधारपदाची पहिलीच मालिका जिंकण्यात यश मिळविले होते.









