एनएचआरसी प्रमुख न्यायाधीश मिश्रांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष (एनएचआरसी) निवृत्त न्यायाधीश अरुण कुमार मिश्रा यांनी दहशतवाद पूर्ण जगात नागरिकांच्या मानवाधिकारंचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले आहे. दहशतवादी कृत्यं तसेच दहशतवाद्यांकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगणे मानवाधिकारांवर ‘मोठा अन्याय’ असल्याचे प्रतिपादन त्यांनी रविवारी केले आहे. ‘भारत मंडपम’मध्ये आयोजित मानवाधिकार दिनानिमित्त कार्यक्रमात मिश्रा यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा नैतिक प्रभाव ‘गंभीर चिंतेचा विषय’ असल्याचे उद्गार काढले आहेत.
रविवारी 75 वा मानवाधिकार दिन साजरा करण्यात आला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे मुख्य अतिथी म्हणून सहभागी झाले. मानवाधिकारांच्या सार्वभौमिक घोषणेत सामील अनेक तरतुदी आमच्या मूल्यांच्या अनुरुप असल्याचे मिश्रा यांनी म्हटले आहे.
विषमतेत वृद्धी, हवामान, जैवविविधता तसेच प्रदूषणाच्या संकटाकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानांमुळे निर्माण झालेली आव्हाने समाजाच्या सलोख्याला धक्का पोहोचवू शकतात. नव्या डिजिटल तंत्रज्ञानाने लोकांच्या राहणीमानाला बदलले आहे. इंटरनेट उपयुक्त असले तरीही याची दुसरी बाजू देखील आहे. बाजू घृणा फैलावणाऱ्या सामग्रीद्वारे खासगीत्वाचे उल्लंघन करत आहे. भ्रामक माहितीद्वारे लोकशाहीवादी प्रक्रियेला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचे न्यायाधीश मिश्रा यांनी म्हटले आहे.
दहशतवादाकडे डोळेझाक नको
इंटरनेटचा गैरभावनेने वापर करण्यात आल्यास समुदायांमध्ये विभाजन निर्माण होऊ शकते आणि यामुळे मानवाधिकारांची स्थिती कमकुवत होऊ शकते. दहशतवाद पूर्ण जगात नागरिकांच्या मानवाधिकारांचे गंभीर उल्लंघन करतो. निर्दोष लोक दहशतवादामुळे पीडित होत असल्याचे दिसून आले आहे. दहशतवादी कृत्यं आणि दहशतवाद्यांकडे डोळेझाक करणे किंवा त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगणे मानवाधिकांप्रति मोठा अन्याय आहे. दहशतवादी कृत्यांचे महिमामंडन करणे टाळले जावे असे मिश्रा यांनी नमूद पेले आहे.









