वृत्तसंस्थ/ न्यूयॉर्क
अमेरिकेची माजी अव्वल आंतरराष्ट्रीय महिला टेनिसपटू तसेच टेनिस हॉल ऑफ फेममध्ये सहभागी करण्यात आलेल्या ख्रिस एव्हर्टला जानेवारी महिन्यात होणाऱ्या 2024 च्या टेनिस हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेला उपस्थित राहता येणार नाही.
ख्रिस एव्हर्टला कर्करोगाची बाधा झाली असून सध्या तिच्यावर वैद्यकीय उपचार चालू आहेत. 68 वर्षीय ख्रिस एव्हर्टला 2021 च्या डिसेंबरमध्ये पहिल्यांदा कर्करोगाची बाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. ख्रिस एव्हर्टने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत 18 वेळा ग्रँडस्लॅम एकेरीची अजिंक्यपदे मिळवली आहेत. 2024 च्या टेनिस हंगामातील होणाऱ्या उर्वरित ग्रँडस्लॅम स्पर्धावेळी आपण उपस्थित राहण्याचा प्रयत्न करु, असे एव्हर्टने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.









