चीनला धक्का देण्याची योजना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयफोन बनवणारी दिग्गज टेक कंपनी ‘अॅपल’ने भारतासाठी मोठी योजना आखली आहे. कंपनीने भारतात दरवषी 5 कोटीहून अधिक आयफोन तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारतातील उत्पादन वाढवतानाच चीनमधून बाहेर पडणे हे कंपनीचे मुख्य ध्येय असल्याचा दावा वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात करण्यात आला आहे. सदर उद्दिष्ट पुढील 2 ते 3 वर्षात साध्य करण्याचा इरादा आहे. अॅपलने निर्धारित लक्ष्य गाठले तर आयफोनच्या जागतिक उत्पादनात भारताचा वाटा एक चतुर्थांश होईल, असे शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे.









