अनिकेत गावडे आहेत तरुण भारतचे कर्मचारी
सावंतवाडी –
कोकणात दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या सन टीव्ही मराठी वाहिनीवरील श्री क्षेत्रपाल वेतोबा या मालिकेत माजगाव – नाईकवाडा येथील अनिकेत अशोक गावडे हे पुन्हा लवकरच झळकणार आहेत . त्यांनी या मालिकेत यापूर्वीही पोस्टमनची भूमिका साकारली होती . आता पुन्हा ते याच भूमिकेत मालिकेत दिसणार आहेत . त्यांना लहानपणापासूनच कलेची आवड आहे . अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो . गावातील नाटकात ते भूमिका साकारत असतात .त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.









