नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या पाठपुराव्याला यश
बेळगाव : मुजावर गल्लीमध्ये डेनेजची समस्या नेहमीच भेडसावत होती. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी मागणी करण्यात आली होती. त्याची दखल या प्रभागाच्या नगरसेविका वैशाली सिध्दार्थ भातकांडे यांनी घेतली. त्यानंतर पाठपुरावा करून युजीडी आणि पिण्याच्या पाण्याची पाईप तसेच कूपनलिकेला विद्युत जोडणी करून दिली. यामुळे समाधान व्यक्त होत आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील मुजावर गल्ली तसेच परिसरामध्ये युजीडीची समस्या भेडसावत होती. वारंवार ड्रेनेजची पाईपलाईन ब्लॉक होत होती. त्यामुळे अनेकांना त्याचा त्रास होत होता. पूर्वी सहा इंच पाईप होती. मात्र आता 9 इंच पाईप घालण्यात आला आहे. याचबराब्sार त्या परिसरात कूपनलिका होती. मात्र त्याला विद्युत पुरवठाच करण्यात आला नव्हता. मात्र आता त्यालाही वीद्युत जोडणी करण्यात आली असून यामुळे पाणीप्रश्न सुटणार आहे. नळाचे पाईप देखील खराब झाले होते. ते देखील बदलण्यात आले आहेत. एकूणच या वॉर्ड क्रमांक 10 मधील असलेल्या समस्या दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.









