कुरुंदवाड : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा हे सहकाराचे माहेर घर आहे.येथील साखर कारखाने हे सहकाराचे आत्मे आहेत.कर्नाटक राज्यातील सिमाभागातील शेतकरी महाराष्ट्र उसाला चांगला भाव मिळतो म्हणून आपल्याकडे ऊस पाठवतात.मात्र आंदोलनामुळे हंगाम लांबल्याने कमी दरात कर्नाटक राज्यातील कारखान्यांना ऊस घालावा लागला.यामध्ये शेतक्रयांचे आणि आपल्या कारखान्याना ऊस न मिळाल्याने सहकाराचे मोठे नुकसान माजी खास.शेट्टी यांच्यामुळे झाल्याची टीका माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी मंगळवारी सायंकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी शेतकरी संघटना( शरद जोशी प्रणित) ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप माणगावे उपस्थित होते.
दरम्यान अल्पभूधारक असणारे ऊस उत्पादक शेतकरी,ऊस वाहतूकदार यांना न्याय देण्यासाठी आणि लवकर ऊस तुटण्यासाठी आम्ही ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. पण खासदारकी भोगलेल्या राजू शेट्टींना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या विरोधात कुरुंदवाडातील माझे राजकीय मित्र आणि शत्रूंना एकत्र घेऊन सभा घ्यावी लागते हा माझा नैतिक विजय आहे. माजी खास शेट्टी यांनी कुरुंदवाडातील आभार सभेत उपस्थिती लावण्यास सांगितले या दोन पाटलांना घेऊन पॅनल करून निवडणूक लढवावी असे आवाहन माजी नगराध्यक्ष डांगे यांनी दिले.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना माजी नगराध्यक्ष डांगे म्हणाले 3500 रुपयाची मागणी करण्राया माजी खास शेट्टी यांनी यावर्षी किती दर मिळवून दिला असा सवाल उपस्थित करत जिह्यातील साखर कारखान्यांनी यंदा उसाचे प्रमाण घटल्याने ऊस मिळवण्यासाठी प्रतिस्पर्धी दर देणार होते.ते त्यांनी 3309 ?रुपयाच्या पुढे दिले आहे.मागील तुटून गेलेल्या उसाचे 400 रुपये मागणीचा रेटा लावून ऊस हंगाम लांबवला यामुळे पर्यायाने ऊस उत्पादक शेतक्रयांचीच नुकसान झाले आणि आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी 100 रुपयांवर तडजोड केली.याचा अल्पभूधारक शेतक्रयांना कोणताच फायदा झालेला नाही.उलट ऊसतोड लांबल्याने घट होऊन नुकसान झाले आहे.
डांगे म्हणाले ऊस उत्पादक शेतक्रयांना त्यांच्या ऊसाला चांगला भाव व घामाचे दाम मिळावे या उद्देशाने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक्रयांची कृती समिती स्थापन केली व लढा उभा केला मात्र माझी खासदार शेट्टी यांनी कृती समिती ही कारखानदारांची पाठराखण करणारे असल्याचा आरोप केला तो धादांत खोटा आहे उलट कृती समितीची दखल सहकार मंत्र्यांनी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करून आमच्या कृती समितीच्या रेट्या ऊस उत्पादक शेतक्रयांना चांगला दर मिळाला हे त्यांनी समजून घ्यावे आम्ही कोणत्याही साखर कारखानदाराची पाठराखण करत नाही शेतक्रयांसाठी ही कृती समितीची चळवळ उभी केली असून ती अशीच सुरू राहणार आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले ते म्हणाले कर्नाटकातील कारखाने सुरू ठेवून त्यांनी सीमा भागातील ऊस उत्पादक शेतक्रयांचे मोठे नुकसान केले आहे यासाठी त्यांनी कोणती तरजोड केली असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.
यावेळी बोलताना दिलीप माणगावे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत शंभर रुपये बाबतचे पत्र दिले म्हणजे ते पैसे दिले असे होत नाही कारण 2007 साली जाहीर केलेल्या 380 रुपयाचे काय झाले तीच अवस्था या शंभर रुपयाची कशावरून होणार नाही असा सवाल उपस्थित केला यावेळी माजी नगरसेवक उदय डांगे, रणजीत डांगे आधी उपस्थित होते