शिक्षण-आरोग्य क्षेत्रांवर लोककल्पचे लक्ष केंद्रित
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या लोककल्पतर्फे चिखले गावातील सरकारी शाळेसाठी आवश्यक साहित्य देण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी दोन क्रिकेट सेट, दोन लगोरी सेट या शिवाय 34 लीटर स्टीलचा वॉटर फिल्टर व दोन संगणक देण्यात आले. खानापूर तालुक्यातील 32 गावे लोककल्पने दत्तक घेतली आहेत. यासाठी लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. त्यांनी या गावातील विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू केले आहेत. दत्तक गावांतील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य, वॉटर फिल्टर, खेळाचे साहित्य देण्यात येत आहे. या शिवाय ग्रामस्थांसाठी आरोग्य चिकित्सा शिबिरे घेण्यात येत आहेत. शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांवर लोककल्पने लक्ष केंद्रित केले आहे. याच हेतुने हे साहित्य देण्यात आले. याप्रसंगी सोसायटीचे कर्मचारी सुरजसिंग राजपूत तसेच सुहास पेडणेकर, अनंत गावडे उपस्थित होते.









