मुंबई :
अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग सोमवारी शेअर बाजारात दमदार तेजीत असताना पहायला मिळाले. जवळपास 15 टक्क्यांची तेजी काही समभागांनी अनुभवली होती. यामध्ये अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे समभाग 14 टक्के वाढत 1178 रुपयांवर पोहोचले होते. सोमवारी जवळपास 8.23 लाख समभागांची खरेदी झाली होती. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 1 लाख 78 हजार 203 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.









