सावंतवाडी –
सावंतवाडी मोती तलावात कोलगाव येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला . अभिषेक अंकुश मेस्त्री (वय ४० ) असे त्या तरुणाचे नाव आहे . तो मूळ मालवण -वराड येथील असून गेली काही वर्षे तो कोलगाव येथे राहत होता . गवंडीकाम कामगार असलेला सदर तरुण मोती तलावाच्या काठावर बसलेला असताना तलावात कोसळला असावा असा अंदाज सावंतवाडी पोलिसांनी व्यक्त केला आहे . काल दुपारपासून तो बेपत्ता होता . दुपारी आपण बाजारात जातो असे सांगून तो घरातून बाहेर पडला होता . पण रात्र झाली तरी तो घरी परतला नाही . दरम्यान काल कोलगावची जत्रा असल्याने तो जत्रेला गेला असावा असे घरच्यांना वाटले . परंतु रात्री उशिरा देखील तो घरी परतलाच नाही . दरम्यान आज सकाळी सावंतवाडी नगरपालिकेचे कर्मचारी मोती तलावात साफसफाईसाठी उतरले असता त्यांना हा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला . त्यांनी त्वरित पोलिसांना कळविल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला . सावंतवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत . त्याच्या पश्चात , पत्नी, दोन मुली ,आई ,वडील, भाऊ असा परिवार आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









