मुंबई :
भारतीय शेअरबाजारात कार्यरत असणाऱ्या टिन्ना ट्रेड लिमिटेड या छोट्या कंपनीने गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. 5 दिवसातच या समभागाने 76 टक्के वाढ दर्शवली आहे. 20 नोव्हेंबर समभागाचा भाव 32 रुपये होता, सोमवारी भाव 56 रुपयांवर पोहचला आहे. एक महिन्यात या समभागाने गुंतवणूकदारांना 110 टक्के इतका भक्कम परतावा दिला आहे. तर सहा महिन्यात हा समभाग 138 टक्के इतका वाढला आहे.