गेले १७ दिवस बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी अथक पर्यंत सुरु होते. अखेर आज एनडीआरएफची टीम त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे. वेगवेगळ्या प्रयत्न करूनही मजुरांना बाहेर काढण्यात अपयश येत होते. अखेर भारतीय सैन्य त्याच्यापर्यँत पोहचाल आहे. थोड्याच वेळात त्यांची सुटका होईल.
बोगद्यात खोदाई संपली असून अडकलेल्य़ा ४१ मजुरांपर्यंत ८०० मीमी व्यासाचा पाईप टाकण्यात आले आहेत. या पाईपमधून एनडीआरएफची टीम मजुरांपर्यंत पोहोचली आहे. बोगद्यामध्ये अँब्युलन्स आणि डॉक्टरांना देखील बोलविण्यात आले आहे. सरेस्क्यू टीमने मजुरांच्या कुटुंबियांना बोलावून त्यांचे कपडे आणि बॅग तयार ठेवण्यास सांगितले आहेत. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिहं धामी देखील तिथं दाखल झाले आहेत.
या मजुरांना बाहेर काढल्यानंतर त्यांनारुग्णालयात नेण्यात येणार आहेत. यासाठी बोगद्याजवळ रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या आहेत.
मजुरांचे स्वागत करण्यासाठी तेथे उपस्थित कर्मचारी फुलांच्या हारांसह पोहोचले आहेत. कामगार बोगद्यातून बाहेर येताच त्यांना फुलांचा हार घालण्यात येणार आहे.