युनिव्हर्सिटी ब्ल्यू किताबाचा मानकरी : पंजाबला रवाना
बेळगाव : मुडलगी, सीएम मुडलगी महाविद्यालय आयोजित राणी चन्नम्मा विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत एमईएस बीपीएड महाविद्यालयाचा विद्यार्थी ओमकार पाटील याने 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकासह ‘युनिव्हर्सिटी ब्ल्यू’ हा मानाचा किताब पटकाविला आहे. व 55 किलो वेटलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. तो इंटर युनिर्व्हसिटी स्पर्धेसाठी पंजाब येथे रवाना झाला आहे. विजापूर येथील मुडलगी येथे घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत 57 किलो फ्री स्टाईल वजनी गटात उपांत्य फेरीत ओमकारने करण पिंगटचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात ओमकारने हरुगीरीच्या महादेव गस्तीचा पराभव करुन त्यांनी सुवर्णपदकासह युनिव्हर्सिटी ब्ल्यू हा मानाचा किताब पटकाविला. त्याला सांगाव कुस्तीगिर संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, ज्येष्ठ कुस्तीपटू रुपेश पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे. कुस्ती प्रशिक्षक नागराज एन., हनमंत पाटील चापगाव यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे. पंजाब येथे होणाऱ्या इंटर युनिर्व्हसिटी कुस्ती स्पर्धेसाठी तो रवाना झाला आहे.









