उत्कृष्ट खेळाडू आदर्श, उत्कृष्ट गोलरक्षक शिवराज
बेळगाव : फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सिल आयोजित फिनिक्स चषक 17 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महिला विद्यालयाने ज्ञान प्रबोधन संघाचा 2-0 असा पराभव करून फिनिक्स चषका पटकाविला. होनगा येथील फिनिक्स स्कूलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामना ज्ञान प्रबोधन व महिला विद्यालय यांच्यात खेळविण्यात आला. सामन्यात एमव्हीएमच्या समर्थ सावगी आणि परशराम पाटील यांनी प्रत्येकी 1 गोल करुन 2-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात ज्ञान प्रबोधन संघाला गोल करण्यात अपयश आले. प्रमुख पाहुणे प्रणय शेट्टी, महाकाली एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व माजी एमएलसी विवेकराव पाटील, फिनिक्स स्कूलचे प्राचार्य तैसीम मकानदार, उपप्राचार्य रामेश्वरी चवारिया, शफुनिसा सुभेदार आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट फुटबॉलपटू आदर्श (गुड शेफर्ड), सर्वाधिक गोल करणारा गौरांग उच्चुकर (सेंट झेवियर्स), उत्कृष्ट गोलरक्षक शिवराज कोणे (महिला विद्यालय) यांना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणुन अभिषेक चेरेकर, समर्थ बांधेकर, आमिन पिरजादे, रॉयस्ट्रीम जेम्स, विष्णू दावणेकर आदींनी काम पाहिले.









