वृत्तसंस्था/ अबु धाबी
येथे झालेल्या मोसमातील शेवटच्या व 23 व्या फॉर्मुला वन ग्रां प्रि शर्यतीचे जेतेपद पटकावत रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने सांगता केली. त्याचे हे या वर्षातील 19 वे जेतेपद आहे. फेरारीच्या चार्लस लेक्लर्कने दुसरे, मर्सिडीजच्या जॉर्ज रसेलने तिसरे स्थान मिळविले.
12 व्यांदा पोल पोझिशनवरून सुरुवात करणाऱ्या व्हर्स्टापेनने लेक्लर्कला संधी न देता शेवटपर्यंत आघाडी कायम राखत जेतेपद पटकावले. रेड बुलच्या सर्जिओ पेरेझने चौथे, मॅक्लारेनच्या लँडो नोरिसने पाचवे, त्याचाच संघसहकारी ऑस्कर पियास्ट्रीने सहावे, अॅस्टन मार्टिनच्या फर्नांडो अलोन्सोने सातवे, अल्फा टॉरीच्या युकी त्सुनोदाने आठवे, मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनने नववे, अॅस्टन मार्टिनच्या लान्स स्ट्रोलने दहावे स्थान मिळविले. रेड बुलने यावर्षी पहिले स्थान मिळविले तर मर्सिडीजने दुसरे व फेरारीने तिसरे स्थान मिळविले.
ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपमध्ये अॅस्टन मार्टिनच्या अलोन्सोने 206 गुणांसह चौथे, फेरारीच्या लेक्लर्कने 206 गुणांसह पाचवे, मॅक्लारेनच्या लँडो नोरिसने 205 गुणांसह सहावे, कार्लोस सेन्झने 200 गुणांसह सातवे स्थान मिळविले.









