वारणानगर प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचा ताबडतोब निर्णय व्हावा आणि मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी बहिरेवाडी ता. पन्हाळा येथील संपत दगडू खाके यांनी आपले स्वतः चे मुडंन करून अनोखे आंदोलन केले. संपत खाके यांनी मराठ्यांना ताबडतोब आरक्षण मिळावे आणि आरक्षणासाठी संदर्भात जरांगे – पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्या साठी एक केश मुडंनाच आंदोलन भैरवनाथ मंदिरा समोर करून राज्य शासनाच्या मराठा विरोधी धोरणाचा निषेध केला. यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते.