वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सातव्या पुरूषांच्या राष्ट्रीय मुष्ठीयुद्ध स्पर्धेला शनिवार दि. 25 नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेमध्ये विविध राज्यातील मुष्ठीयोद्धे सहभागी होणार आहेत. आतापर्यंत सहा वेळा आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक मिळविणारा भारताचा शिवा थापा तसेच अमित पांगल यांचा संघात समावेश राहिल.
63 किलो गटात भारताच्या शिवा थापाने आतापर्यंत सहा वेळेला आशियाई स्पर्धेत पदक मिळविले आहे. तसेच 2019 च्या विश्च मुष्ठीयुद्ध स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारा अमित पांगल राष्ट्रीय मुष्ठीयुद्ध स्पर्धेत सहभागी होणार आहे. आसामच्या शिवा थापाने सहाव्या राष्ट्रीय मुष्ठीयुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. आता यावेळी अव्वल स्पर्धकांमध्ये सुवर्णपदकासाठी चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत. 51 किलो वजन गटात अमित पांगल सेनादलाचे प्रतिनिधित्व करीत आहे. या स्पर्धेत टोकियो ऑलिम्पियन स्पर्धक आशिशकुमार (80 किलो), 2021 च्या आशियाई स्पर्धेतील चॅम्पियन संजित, 2021 च्या विश्च युवा चॅम्पियनशिप स्पर्धेत 57 किलो गटात सचिन, 92 किलो वजन गटात आशियाई चॅम्पियन संजित गेल्या वेळी सेनादलाने या स्पर्धेचे सर्वंकष जेतेपद मिळवले होते.









