नवी दिल्ली
मुंबईत मुख्यालय असणाऱ्या येस बँकेने तुषार पाटणकर यांना मुख्य जोखीम अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. नवनियुक्त तुषार पाटणकर हे आपल्या नव्या पदाचा कार्यभार 1 डिसेंबर 2023 पासून तीन वर्षाकरिता सांभाळणार आहेत. पाटणकर हे 20 नोव्हेंबर रोजी याच वर्षी बँकेत रुजू झाले आहेत. यापूर्वी तुषार यांनी एल अँड टी फायनान्शिअल सर्व्हिस, एचएसबीसी,आयडीएफसी फर्स्ट बँक, बजाज फायनान्स यासारख्या बँकेमध्ये काम केले आहे.









