नवी दिल्ली
टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांची विक्री थायलंडमध्येदेखील सुरू झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. टाटा मोटर्सने आपल्या सुपर एस, अल्ट्रा टी 9, अल्ट्रा टी 4 अशा ट्रक्स थायलंडच्या बाजारामध्ये दाखल केल्या आहेत. यावर्षी एप्रिलमध्ये टाटा मोटर्सने थायलंडमध्ये व्यावसायिक वाहनांच्या विक्रीकरिता इंचकेप पीएलसी या कंपनीबरोबर भागीदारी केली होती. या भागीदारी अंतर्गत टाटा मोटर्स आपल्या व्यवसायिक वाहनांची विक्री संपूर्ण थायलंडमध्ये करू शकणार आहे. यायोगे थायलंडमध्ये वाहनांच्या माध्यमातून व्यवसाय वाढवता येणे टाटाला शक्य होणार आहे.









