भ्रष्टाचारविरोधी संहितेच्या उल्लंघनप्रकरणी दोषी
वृत्तसंस्था /दुबई
वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज मार्लन सॅम्युअल्सवर गुऊवारी अमिरात क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेचा भंग केल्याबद्दल सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सहा वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. 71 कसोटी, 207 एकदिवसीय सामने आणि 67 टी20 सामने खेळलेल्या सॅम्युअल्सवर सप्टेंबर, 2021 मध्ये अमिरात मंडळाची नियुक्त भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिकारिणी या नात्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने चार गुह्यांसंदर्भात आरोप ठेवले होते. 42 वर्षीय सॅम्युअल्सला ऑगस्टमध्ये लवादाने दोषी ठरवले आणि त्याच्यावरील बंदीला 11 नोव्हेंबरपासून सुऊवात झाली आहे. हे आरोप 2019 मधील ‘अबू धाबी टी10 लीग’शी संबंधित आहेत. ‘आयसीसी’ने गुऊवारी सांगितले की, खेळाडू किंवा क्रिकेट खेळाची अप्रतिष्ठा होऊ शकेल अशा परिस्थितीत दिलेल्या किंवा मिळालेल्या कोणत्याही भेटवस्तू, रक्कम, आदरातिथ्य किंवा इतर लाभ कुणाकडून मिळाले हे नियुक्त केलेल्या भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिकाऱ्यांसमोर उघड करण्यात सदर माजी अष्टपैलू खेळाडू अपयशी ठरला. 750 डॉलर्स किंवा त्याहून अधिक मूल्याचे आदरातिथ्य कुणाकडून मिळाले हेही नियुक्त केलेल्या भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिकाऱ्यांसमोर उघड करण्यात तो अयशस्वी झाला.
तसेच अधिकाऱ्यांच्या तपासात सहकार्य करण्यातही तो अयशस्वी झाला. तपासाशी संबंधित असलेली आवश्यक माहिती लपवून अधिकाऱ्यांच्या तपासात अडथळा आणणे किंवा विलंब करणे याहीसंदर्भात तो दोषी आढळलेला आहे, असे आयसीसीच्या निवेदनात म्हटले आहे. आयसीसीच्या एचआर व इंटेग्रिटी युनिटचे सरव्यवस्थापक अॅलेक्स मार्शल यांनी सॅम्युअल्सवरील बंदी ही असे प्रकार रोखण्याच्या दृष्टीने मजबूत प्रतिबंधक बाब म्हणून काम करेल, असे म्हटले आहे. सॅम्युअल्स जवळपास दोन दशके आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. यादरम्यान त्याने अनेक भ्रष्टाचारविरोधी सत्रांमध्ये भाग घेतला आणि भ्रष्टाचारविरोधी संहितेच्या अंतर्गत आपली जबाबदारी नेमकी काय आहे हे त्याला माहीत होते. सॅम्युअल्स आता निवृत्त झालेला असला तरी जेव्हा गुन्हा घडला तेव्हा तो सहभागी होता. सहा वर्षांची ही बंदी नियम तोडण्याचा इरादा बाळगणाऱ्या कोणत्याही खेळाडूला रोखण्याच्या दृष्टीने एक मजबूत प्रतिबंध म्हणून काम करेल’, असे मार्शल म्हणाले. सॅम्युअल्सने 2012 आणि 2016 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 हजारांहून हून अधिक धावा केल्या. मे, 2008 मध्ये त्याची किंवा क्रिकेट खेळाची अप्रतिष्ठा होऊ शकते अशा प्रकारे पैसे किंवा इतर लाभ घेतल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.









