कोलगाव येथील खळा बैठकीत आदित्य ठाकरे विरोधकांवर बरसले
सावंतवाडी । प्रतिनिधी
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज सावंतवाडीत ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या खळा बैठकीला आले होते .यावेळी त्यांनी विद्यमान शिंदे सरकारवर प्रहार केला .ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी चंद्रकांत कासार यांच्या माजगाव येथील निवासस्थानी सर्वप्रथम आदित्य ठाकरे उपस्थित राहिले आणि त्यानंतर मायकल डिसोजा यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या खळा बैठकीत आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला .यावेळी त्यांनी विद्यमान शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला . येत्या ३१ डिसेंबरला हे खोके सरकार पडणार म्हणजे पडणार असे प्रतिपादन त्यांनी येथे केले . सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपूर्वी आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर करावा असा आदेश दिलाय . आपण जर संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे सरकार पूर्णतः बेकायदेशीर आहे . या राज्यात हे सरकार सत्तेवर आल्यामुळे लोकशाहीचा खूनच झालाय . त्यामुळे हे घटनाबाह्य सरकार पडणे खूप गरजेचे आहे ..असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले . या खळा बैठकीला खासदार विनायक राऊत , आ . वैभव नाईक , युवासेना सचिव वरुण सरदेसाई , तालुकाप्रमुख रुपेश राऊळ , चंद्रकांत कासार , मायकल डिसोजा व ठाकरे सेनेचे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .









