नवी दिल्ली :
भारतीय विमा निगम ऑफ इंडिया (एलआयसी) यांनी देशातील सर्वात मोठी तिसऱ्या नंबरची बँक असणारी बँक ऑफ बडोदामध्ये अतिरिक्त समभागांचे अधिग्रहण करणार असल्याची घोषणा केली आहे. ज्यामध्ये कंपनी 5 टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा अधिकचा वाटा घेणार आहे. हा व्यवहार जवळपास 48.3 कोटी रुपयांमध्ये पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
अधिग्रहण करण्यात येणार असल्याच्या बातमीमुळे मात्र दोन्ही कंपन्यांच्या समभागात तेजी न राहता यामध्ये घसरणीचा कल राहिल्याचे दिसून आले. बँक ऑफ बडोदाने दिलेल्या माहितीनुसार 15,000 कोटी रुपये जोडण्याच्या दिशेने काम करणार आहे.
बँक ऑफ बडोदा नफा कमाईत
बँकेची कामगिरी ही नफा कमाईत असून सप्टेंबरमधील आकडेवारीचा कल पाहिल्यास याचा फायदा आगामी काळात होणार असल्याचा दावाही बँकेने व्यक्त केला आहे.









