न्हावेली / वार्ताहर
मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरातील जागर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे या जागर उत्सव कालावधीत मंदिरातील विविध धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत रवळनाथ देवाच्या जत्रोत्सवाने या जागराची सांगता होणार आहे.
मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरात दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुराची पौर्णिमा या कालावधीत जागर उत्सव होत असतो. महिनाभर सुरु असलेल्या या जागर कालावधीत दर दिवशी मंदिरात पुराणवाचन व मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा काढली जाते. पालखीनंतर देवाची आरती व गाऱ्हाणे झाल्यावर उपस्थित सर्वांना प्रसाद वाटप केला जातो त्रिपुरारी पौर्णिमेला रवळनाथ देवाच्या वार्षिक जत्रोत्सवाने या जागराची सांगता केली जाते. यंदा रवळनाथ देवाच्या जत्रोत्सव २६ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे या जत्रोत्सवानंतर गावातील जत्रोत्सवास प्रारंभ होते रोज मानकरी व ग्रामस्थ उपस्थिती दर्शवत जागराचा व पुराणवाचनाचा लाभ घेत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









