बंदोबस्त करण्याकडे मनपाचे दुर्लक्ष : नागरिकांतून संताप
बेळगाव : शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे शहरातील जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विजयनगर-हिंडलगा परिसरातील टीचर्स कॉलनी आणि ओंमकारनगर परिसरात भटक्या कुत्र्यांमुळे जनता भयभीत झाली आहे. तेव्हा तातडीने महापालिकेने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून अचानकपणे ही कुत्री हल्ला करत आहेत. त्यामुळे घरातून बाहेर पडणे देखील अवघड झाले आहे. रात्रीच्यावेळी कळप करुन ही कुत्री फिरत असतात. अचानकपणे नागरिकांवर व लहान मुलांवर हल्ला करत आहेत. कुत्र्यांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांना आवर घालणे कठीण जात आहे. तेव्हा महापालिकेने तातडीने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही कुत्री या परिसरात कळप करुन फिरत आहेत. त्यामुळे महिलावर्गामध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे. काही जणांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. तेव्हा महापालिकेने याकडे लक्ष द्यावे, याचबरोबर हिंडलगा ग्राम पंचायतीनेही लक्ष देऊन या परिसरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.









