प्रतिनिधी/ बेळगाव
सामाजिक कार्य केल्याबद्दल फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे पोलीस विभागाकडून कौतुक करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर व अवधूत तुडवेकर यांचा खडेबाजार पोलीस स्थानकाचे एसीपी अरुणकुमार कोळूर यांनी सत्कार केला. यापुढेही असेच सामाजिक उपक्रम राबवावेत, अशी आशा अरुणकुमार यांनी व्यक्त केली.









