आज सामना सुरू होण्याअगोदर माझे परममित्र गजाभाऊ यांचा मला फोन आला, आजच्या मॅच चा हवामानाचा अंदाज काय? मी लगेच म्हणालो नवमी नंतर काय येतं, तर तो म्हणाला दशमी. मग झालं आज विजयाची दशमी बघायला मिळेल. लगेच तो म्हणाला ते किवी आहेत मागची उपांत्य फेरी तुम्हाला आठवते ना! मी म्हटलं ठशुभ बोल न्रायाठ. आणि मी माझा फोन कट केला. काल ख्रया अर्थाने भारतीय संघाने किवींच्या जखमांवरती नख ओरबडली. हा सामना सुरू होण्याअगोदर ख्रया अर्थाने भारतीय संघावर दबाव होता. दबाव या अनुषंगाने की भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध मागील चार नॉकआऊट सामन्यात पराभव झाला होता.
असो. हा झाला इतिहास. परंतु आज भारताने एक नव्याने इतिहास लिहिला. नियतीने एकदा का ठरवलं की एखाद्याला भरभरून द्यायचं तर ते नियती देतेच देते. या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची होती. अर्थात या सामन्यात परमेश्वरही रोहितच्या मागे उभा होता, किंबहुना तो हेच म्हणत असावा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे. भारताच्या सलामी वीराने पहिल्या सहा ते सात षटकात किवींची भेदक वाटणारी गोलंदाजी अक्षरश? खिळखिळी करून टाकली. पहिल्या दहा षटकात गिल आणि रोहित शर्माने आक्रमकतेचा पाया रचला. कसला मानसिक दबाव आणि कसलं काय टेन्शन, एखादा ग्रुप सहलीला जाऊन दिवसभरात मजा मस्ती करतो अगदी तसंच भारतीय फलंदाजाने ख्रया अर्थाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एक दिवसीय सहलीचा आनंद घेतला. विशेषत? शुभमन गिलने पहिल्या दोन-तीन सामन्यातील कमतरता त्यांनी या महत्त्वपूर्ण सामन्यात भरून काढली.
आपण जिंकतोय की समोरच्याला नेस्तानाबूत करतो हेच समजत नाही. उपांत्यपरीत आपण किवीना एवढ्या सहजतेने आपण धोबीपछाड देऊ याची अपेक्षा प्रामाणिकपणे मला कधीच नव्हती. पहिले नऊ सामने वेगळे, आणि हा सामना वेगळा. त्यातच मागच्या विश्वचषकातील उपांत्य फेरीतील पराभवाची गडद छाया भारतीय टीम समोर होतीच. विराट कोहली हे रन मशीन आहे की शतकांचा बादशहा? क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकवण किती सोपी कला आहे हे पुन्हा एकदा विराट कोहलीने आज दाखवून दिले. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुनील गावस्कर यांनी शतकांचा पाया रचला. त्यानंतर शतकांवर शतक बघण्याची सवय सचिनने लावली. पण या सर्व गोष्टींचा परिपाक किंवा कळस केला तो ठविराट प्रेम कोहलीनेठ मी मागच्या लेखात म्हटलं होतं की विराट कोहलीचे पन्नासाव शतक हे निर्णयाक सामन्यात यावं, तेही दर्जेदार संघाविरुद्ध याचीच याचना मी देवाकडे करत होतो. आणि अखेर देव पावला!
नियतीने खूप वर्षांपूर्वीच विराट कोहली बद्दलची पटकथा लिहिली होती. तुझं पन्नासाव झटपट क्रिकेट मधील शतक सादर होईल ते क्रिकेटच्या पंढरीतच. ते क्रिकेटचा देव सचिनच्या मैदानातच. आणि तेही क्रिकेटचा देव सचिनच्या समोरच. आज जर स्वर्गीय सर डॉन ब्रॅडमन जिवंत असते तर त्यांनी निश्चितच विराट कोहलीची गळाभेट घेतली असती. केवढी मेहनत! केवढं ते क्रिकेट बद्दल समर्पण! सर्वप्रथम सुनील गावस्कर, त्यानंतर सचिन तेंडुलकर आणि आता विराट कोहली. तिघेही लिटिल मास्टर. आणि तिघेही कव्हर ड्राईव्ह चे निस्सीम भक्त. मी तर असं म्हणेन की आज ख्रया अर्थाने भारतीयांची दिवाळी गोड झाली. विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. परंतु हा विक्रम पुन्हा भारतीयच मोडतोय यासारखी दुसरी कुठलीच अभिमानास्पद गोष्ट नसणार.
मागच्या लेखात म्हटले होते की श्रेयस याच्या बॅटमधील वायरस दूर झालाय आणि आज त्याच्या सलग दुस्रया शतकाने सिद्ध केलं. त्याच पदलालित्य बघण्यासारखं होतं. ऐन मोक्याच्या क्षणी केलेलं साहसी शतक निश्चितच क्रिकेटच्या चाहत्यानचा स्मरणात राहणारे. हे शतक डू ऑर् डाय सिच्युएशनच्या मॅच मधलं होतं. विराट कोहली आणि श्रेयस ज्यावेळी फलंदाजी करत होते त्यावेळी धावाच धावा चहूकडे असे दृश्य बघायला मिळत होतं.
आज किविंचे गोलंदाज पूर्णत? निष्प्रभ ठरले. त्यांच्या भात्यातला सेफ डिपॉझिट असणारा सेंटनर यालाही आपल्या सेफ डिपॉझिट वर कर्ज काढावे लागले. त्यांची गोलंदाजी आज थोडीशी दुय्यम दर्जाची वाटली. किविच्या गोलंदाजींचा बोल्ट ख्रया अर्थाने भारतीय फलंदाजांनी सैल केला.
पहिले दोन झटपट गडी बाद झाल्यानंतर विल्यम्सन आणि मीचेल यांनी काही काळ भारतीय गोलंदाजांच्या तोंडाला ख्रया अर्थाने फेस आणला होता. परंतु पुन्हा एकदा रोहितने आपले मोहम्मद शमी नावाचं ब्रह्मास्त्र बाहेर काढल. आणि बघता बघता न्यूझीलंडच्या संघ नेसतानाबूत झाला. विशेषत? मीचेलचे शतक न्यूझीलंडसाठी कायमचे संस्मरणीय राहील. त्यांनी केलेले प्रयत्न शेवटी अपुरेच पडले. महत्त्वाच्या सामन्यात त्याच्या फलंदाजीला निश्चितच सलाम करावा लागेल. एकंदरीत भारतीय संघाने मागच्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतला पराभवाचा वचपा आज काढला. निर्णायक सामन्यात भारतीय संघाने कुठलेही मानसिक दडपण न घेता केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास पात्र. असो. पहिले दोन सामने लीग मधील संपल्यानंतर मी भविष्यवाणी केली होती की भारतीय संघ सर्वच्या सर्व सामने जिंकेल. आणि बघता बघता माझी भविष्यवाणी 98ज्ञ् खरी झाली. आता फक्त एक पाऊल शिल्लक. चला पुन्हा एकदा भारतीय संघाचा अभिनंदन करूया आणि अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा देऊया. वेल डन इंडिया!
क्रिकेट समालोचक विजय बागायतकर









