वृत्तसंस्था/ कुमामोटो, जपान
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण मिळविलेल्या सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांना येथे सुरू असलेल्या जपान मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला.
सात्विक-चिराग यांना या स्पर्धेत अग्रमानांकन मिळाले होते. त्यांच्या जागतिक मानांकनात 21 व्या स्थानावर असणाऱ्या चिनी तैपेईच्या लु चिंग याव व यांगा पो हान यांच्याकडून 21-16, 18-21, 16-21 असा पराभव स्वीकारावा लागला. सात्विक-चिराग सध्या जागतिक मानांकनात पाचव्या स्थानावर असून लु व यांग यांना गेल्या वर्षी प्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत हरविले होते.









