नवी दिल्ली :
अपोलो मायक्रो सिस्टम्स या समभागाने दुपारी शेअरबाजारात 10 टक्के इतकी उसळी घेतली असून गेल्या महिन्यात समभाग 100 टक्के इतका वाढला असून गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. 3500 कोटी रुपये बाजार भांडवल मूल्य असणाऱ्या या कंपनीने 52 आठवड्यानंतर उच्चांकी स्तरावर झेप घेतली आहे. गेल्या 5 दिवसात हा समभाग 13 टक्के तर 1 महिन्यात 100 टक्के परतावा देण्यात यशस्वी झाला आहे.









