सोलापूर :
दिवाळीच्या सणातील आज बुधवारी भाऊबीजेचा दिवस. प्रत्येक घरात ओवाळणीची तयारी सुरू असतानाच सोलापुरात सकाळी सातच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. कर्तव्यावरून नुकताच घरी गेलेल्या पोलीस अंमलदाराने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
राहुल शिरसाट ( रा. केशवनगर पोलीस वसाहत सोलापूर) नेमणूक पोलीस मुख्यालय असे आत्महत्या केलेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. आत्महत्येचे कालण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. शिरसाट यांचा मृतदेह शविच्छेदनासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.









