प्रतिनिधी/ बेळगाव
मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार के. व्ही. प्रभाकर व गिरीश कोटे यांचा शनिवारी सकाळी येथील श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने हृद्य सत्कार करण्यात आला. याचवेळी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकारांचाही गौरव करण्यात आला.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, गदग तोंटदार्य मठाचे डॉ. तोंटद सिद्धराम स्वामीजी, आमदार राजू सेठ, श्रमिक पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष शिवानंद तगडूर, राज्य उपाध्यक्ष पुंडलिक बाळोजी, जिल्हा अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे, उपाध्यक्ष राजशेखर पाटील, माहिती खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, सर्वोत्तम जारकीहोळी आदी उपस्थित होते.
याच कार्यक्रमात वृत्तपत्र विक्रेत्यांना सायकली वितरित करण्यात आल्या. ग्रामीण भागातील पत्रकारांना बसपास मिळवून देण्यासंदर्भात व पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासंबंधी आपण प्रयत्न करणार असल्याचे के. व्ही. प्रभाकर यांनी सांगितले. पत्रकारांसाठी बुडाचे भूखंड मंजूर करण्यासंबंधीही निर्णय घेण्यात येणार असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. अडचणीतील पत्रकारांना पत्रकार संघाच्यावतीने आर्थिक मदत केली जात आहे, असे जिल्हाध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे यांनी सांगितले.









